भारताचा श्रीलंकेवर २२२ धावांनी महाविजय

मोहाली- मोहनी पार पडले पडलेल्या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी श्रीलंकेवर वर्चस्व.रवींद्र जडेजा (४/४६) आणि रविचंद्रन अश्विन (४/४७) या अनुभवी जोडीने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाला फिरकीच्या तालावर नाचवले. त्यामुळे मोहाली येथील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी महाविजय मिळवला.

शनिवारच्या ४ बाद १०८ धावांवरून पुढे खेळतानाही श्रीलंकेची घसरगुंडी कायम राहिली. रवींद्र जडेजाने कारकीर्दीत १०व्यांदा डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्याला जसप्रीत बुमरा, अश्विन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून उत्तम साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांत संपुष्टात आला. पथुम निसंकाने (नाबाद ६१) श्रीलंकेकडून एकाकी झुंज दिली. भारताने तब्बल ४०० धावांची आघाडी मिळवल्यामुळे श्रीलंकेवर फॉलोऑन लादला.

 

दुसऱ्या डावात श्रीलंकन फलंदाजांकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा होती. परंतु जडेजा-अश्विनपुढे त्यांनी पुन्हा एकदा शरणागती पत्करली आणि ६० षटकांत १७८ धावांत त्यांचा दुसरा डावही आटोपला. निरोशन डिकवेल्लाने (नाबाद ५१) यावेळी झुंज देण्याचा प्रयत्न केला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (२७), अँजेलो मॅथ्यूज (२८), धनंजया डीसिल्व्हा (३०) यांनीही काही काळ भारताचा विजय लांबवला. अखेर अश्विनने लाहिरू कुमाराला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या दिवशी तब्बल १६ गडी गारद झाले.

मोहालीचे मैदान माझ्यासाठी फलदायी ठरते. १७५ धावांच्या खेळीदरम्यान कोणते विक्रम मोडले, याची मला कल्पना नाही. मी नैसर्गिक खेळावर भर दिला. परंतु संघासाठी अष्टपैलू योगदान देता आल्याचे समाधान आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी आतुर आहे.

५ भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील पाचवा, तर मोहालीतील सर्वात मोठा विजय ठरला.

 

३ एकाच कसोटीत दीड शतक आणि डावात पाच बळी असा दुहेरी पराक्रम करणारा रवींद्र जडेजा हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी, विनू मंकड (वि. इंग्लंड, १९५२) आणि पॉली उम्रीगर (वि. वेस्ट इंडिज, १९६२) यांनी अशी कामगिरी केली होती.

 

You might also like

Comments are closed.