रावळिपडी – बिनबाद ५ धावांवरून पुढे खेळताना वॉर्नर-ख्वाजा यांनी १५६ धावांची सलामी नोंदवली.
डावखुरा सलामीवीर उस्मान ख्वाजा (१५९ चेंडूंत ९७ धावा), अनुभवी डेव्हिड वॉर्नर (११४ चेंडूंत ६८) आणि मार्नस लबूशेन (११७ चेंडूंत खेळत आहे ६९) या त्रिकुटाने झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
रावळिपडी येथे सुरू असलेल्या या लढतीत अंधूक सूर्यप्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने २ बाद २७१ धावांपर्यंत मजल मारली होती. लबूशेनच्या साथीला स्टीव्ह स्मिथ २४ धावांवर खेळत असून ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात अद्यापही २०५ धावांनी पिछाडीवर आहे.
शनिवारच्या बिनबाद ५ धावांवरून पुढे खेळताना वॉर्नर-ख्वाजा यांनी १५६ धावांची सलामी नोंदवली. मग २ बाद २०३ धावांवरून स्मिथ-लबूशेन यांनी तिसऱ्या गडय़ासाठी आतापर्यंत ६८ धावांची भर घातली.