‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक सामना
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महामुकाबला

एकदिवसीय विश्वचषक 2023 यावर्षी भारतामध्ये खेळला जाणार आहे. वर्ल्डमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. अशात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला कधी खेळला जाणार आहे? याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
5 ऑक्टोबर 2023 पासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआय वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. यामध्ये सर्व क्रिकेट रसिकांना भारत पाकिस्तान सामन्याची उत्सुकता लागली आहे.
भारत आणि पाकिस्तान महामुकाबला 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी खेळला जाईल, असे सांगण्यात आले आहे. आयसीसीने एकदिवसीय विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक तयार केलेले असून आयपीएल 2023 संपल्यानंतर त्याबद्दल घोषणा केली जाणार आहे.
दरम्यान, वर्ल्ड कप मधील भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राहणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियम मध्ये एका वेळी तब्बल एक लाख प्रेक्षक बसू शकतात. भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चाहते येतात. त्यामुळे बीसीसीआयने या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम निवडले आहे.
Comments are closed.