छत्रपती संभाजीनगर जिल्हा वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा

राज्य चॅम्पियनशिप साठी खेळाडूंच्या एफ आय यूआयडी (AFI UID) क्रमांकाशिवाय प्रवेश स्वीकारता येणार नाही

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): जिल्हा ॲथलेटिक्स संघटना यांच्या विद्यमानाने जिल्हा वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन सोमवार दि.१५ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील ॲथलेटिक्स ट्रॅक वर आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेतून निवड झालेल्या छत्रपती संभाजीनगर संघाचा राज्यस्तरीय वरिष्ठ स्पर्धेमध्ये सहभाग होईल.

या स्पर्धेत 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 5000 मी, 10000 मी, 110 मीअडथळा शर्यत, 100 मी व 400 मी अडथळा शर्यत, 3000 मी, स्टिंपल चेस, 20 किमी चालणे, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, पोल बॉल्ट, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडा फेक व इत्यादी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होतील.

या स्पर्धेत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मंडळे, शाळा संस्था आहे. व इतर खेळाडू सहभागी होऊ शकतील. दि.१४ मे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवा व आपला स्पर्धेतील सहभाग निश्चित करावा. या स्पर्धेमध्ये वय वर्ष 16 वरील सर्व पुरुष व महिला गट यांचा सहभाग नोंदविला जाईल. स्पर्धा राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन नियुक्त निरीक्षकांच्या उपस्थितीत पूर्ण होतील. जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्य संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा ॲथलेटीक्स संघटनेचे अध्यक्ष माजी आ.श्रीकांत जोशी, राज्य संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा

1) अनिल निळे 8007648147
2) राहुल अहिरे 9823334427
3) आकाश जाधव 8379839866

महत्त्वाची सूचना
सर्व जिल्हा खेळाडूंना आवाहन करून दिले जाते की, राज्य चॅम्पियनशिप साठी खेळाडूंच्या एफ आय यूआयडी (AFI UID) क्रमांकाशिवाय प्रवेश स्वीकारता येणार नाही. नवीन यूआयडी (UID)मिळण्यासाठी सुमारे सात दिवस लागतात.

You might also like

Comments are closed.