फरीदकोट मधील हरिंदा भागात रात्री आंतरराष्ट्रीय महिला शूटिंग खेळाडूने आपल्याच शूटिंग करणे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.मृत तरुणी 19 वर्षाची असून तिचं नाव खुष किरतकौर असे आहेत.ती नुकत्याच आयोजित केलेल्या पतियाळा येथील नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली होती. या वेळी एकही मेडल न मिळाल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या तणावात होती.
सांगितले जात आहे की, रात्री ती आपल्या घरात आजी सोबत झोपली होती. आपले नात असं काही करेल याबाबत आजीला कल्पना देखील नव्हती. सकाळी कुटुंबाने पाहिले तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. खुशकिरतने शूटिंग गन आपल्या डोक्यावर ठेवून गोळी चालवली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टम साठी पाठवला.