भारताने सुवर्ण इतिहास घडवला, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’

‘थॉमस कप’ या प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. भारताच्या बॅडमिंटन संघाने पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंडोनेशियाला ३-० ने क्लिन स्वीप करत सुवर्ण इतिहास घडवला आहे. ७३ वर्षांमध्ये पहिल्यांदा भारताचे ही अद्वितीय कामगिरी केली आहे.

पहिल्या दुहेरी सामन्यात लक्ष्य सेनने एँथोनी सिनिसुकाला ८-२१, २१-१७, २१-१६ ने पराभूत केले होते. दुसऱ्या दुहेरी सामन्यात सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने १८-२१, २३-२१, २१-१९ ने विजय मिळवला. तिसरा सामना एकेरी राहिला, ज्यामध्ये किदांबी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीला २१-१५, २३-२१ ने पराभूत केले.

तत्पूर्वी भारतीय संघाने मलेशिया आणि डेन्मार्क सारख्या संघांना पराभूत करत पहिल्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात त्यांनी १४ वेळच्या विजेत्या इंडोनेशियाला पराभूत करत भारतीयांची मान जगभर उंचावली आहे.

You might also like

Comments are closed.