• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; नक्की वाचा

by pravin
January 22, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; नक्की वाचा
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

कसोटीतील मानहानीनंतर किमान एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ आफ्रिकेत यश मिळवेल, अशी आशा बाळगणाऱ्या तमाम चाहत्यांचा शुक्रवारी हिरमोड झाला. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खचलेल्या भारतीय संघाला आफ्रिकेने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सात गडी आणि ११ चेंडू राखून सहज धूळ चारली.

भारताने दिलेले २८८ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने ४८.१ षटकांत गाठून तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे उभय संघांतील रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्याचे महत्त्व कमी झाले. क्विंटन डीकॉक (६६ चेंडूंत ७८ धावा) आणि जानेमन मलान (१०८ चेंडूंत ९१) ही सलामी जोडी आफ्रिकेच्या विजयाची शिल्पकार ठरली.

प्रथम फलंदाजी करताना डावखुरा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने (७१ चेंडूंत ८५) कारकीर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. त्याला राहुल (७९ चेंडूंत ५५) आणि शार्दूल ठाकूर (३८ चेंडूंत ४०) यांच्या बहुमूल्य योगदानाची साथ लाभल्यामुळे भारताने ५० षटकांत ६ बाद २८७ धावांपर्यंत मजल मारली.

माजी कर्णधार विराट कोहली कारकीर्दीत १४व्यांदा शून्यावर बाद झाला. तर श्रेयस अय्यर (११), वेंकटेश अय्यर (२२) पुन्हा छाप पाडण्यात अपयशी ठरले. परंतु पंतने कारकीर्दीतील चौथे, तर राहुलने १०वे अर्धशतक झळकावतानाच तिसऱ्या गडय़ासाठी ११५ धावांची भागीदारी रचून संघाला पावणेतीनशे धावांपलीकडे नेले. अखेरच्या षटकांत मुंबईकर शार्दूलने आणखी एकदा त्याचे अष्टपैलूत्व सिद्ध केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना डीकॉकने पहिल्या षटकापासूनच आक्रमणावर भर दिला. विशेषत: भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटूंवर त्याने सातत्याने हल्ला केला. त्यातच ३२ धावांवर पंतने त्याला यष्टीचीत करण्याची संधी गमावली. डीकॉक आणि मलान यांच्या जोडीने १३२ धावांची सलामी देत विजयाची पायाभरणी केली. ठाकूरने डीकॉकला पायचीत पकडले. तर भारताचा दिवसातील सर्वोत्तम गोलंदाज ठरलेल्या जसप्रीत बुमराने मलानचा अडसर दूर केला.

मात्र सलामीवीरांची मेहनत वाया जाऊ न देता टेम्बा बव्हुमा (३५), रासी व्हॅन डर डसन (नाबाद ३७), एडिन मार्करम (नाबाद ३७) यांनी संयमी फलंदाजी करून आफ्रिकेचा विजय सुनिश्चित केला. भारताच्या सलग दुसऱ्या पराभवामुळे राहुलचे नेतृत्वकौशल्य, मधल्या फळीची हाराकिरी, गोलंदाजीतील सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव यांसारखे मुद्दे चर्चेचा विषय ठरत आहेत.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ६ बाद २८७ (ऋषभ पंत ८५, के. एल. राहुल ५५; तबरेझ शम्सी २/५७) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : ४८.१ षटकांत ३ बाद २८८ (जानेमन मलान ९१, क्विंटन डीकॉक ७८; जसप्रीत बुमरा १/३७)

सामनावीर : क्विंटन डीकॉक

८५ ऋषभ पंतने (८५) भारतीय यष्टिरक्षक-फलंदाजांद्वारे आफ्रिकेविरुद्धची सर्वोत्तम खेळी साकारली. त्याने राहुल द्रविडच्या ७७ (दरबान, २००१) धावांच्या खेळीला पिछाडीवर टाकले.

Tags: Cricketindiasouthafrica
ShareTweetSend
Next Post
दहावी-बारावीच्या खेळाडूंना ग्रेस गुण मिळणार ;ओम प्रकाश बकोरिया

दहावी-बारावीच्या खेळाडूंना ग्रेस गुण मिळणार ;ओम प्रकाश बकोरिया

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.