‘विशेष ऑलिम्पिक 2022’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार अभिनेता सोनू सूद

मुंबई : कोरोना काळात लोकांचा मासिहा बनलेला अभिनेता सोनू सूद सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे याचे कारण म्हणजे नुकताच सोनूने त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला आणि या खास दिवशी सोनूला स्पेशल ऑलिम्पिक मूमेंट ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलं असल्यामुळे होत आहेत.

सोनूने हि गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर करत लिहले आहे की, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत खास आहे. मला विशेष ऑलिम्पिकच्या या यात्रेत सहभागी होण्याचा आनंद होत आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. या मंचाला अजून मोठं करण्यात तसेच भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे वचन देतो.” असं सोनू म्हंटला आहे. तसेच पुढील वर्षी रुस मध्ये होणाऱ्या विशेष ऑलिम्पिक विश्व हिवाळी खेळाच्या भारतीय दलाचा भाग होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती देखील समोर येत आहे.

दर दोन वर्षांनी हा खेळ आयोजित करण्यात येतो. बौद्धिक अपंग व्यक्तींसाठी ही सर्वात मोठी जागतिक क्रीडा स्पर्धा आहे. सोनू सूदने खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केलं आणि त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. विशेष ऑलिम्पिक आशिया पॅसिफिक प्रदेशाचा उपक्रम असलेल्या #Walk For Inclusion खेळाडूंनी त्यांची ओळख करून दिली.

You might also like

Comments are closed.