प्रतिनिधी
आज आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या बेंगलोर समोर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. तर यामध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन साठी एक आनंदाची बातमी आहे,स्टार खेळाडू अष्टपैलू हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरला असून त्याची वापसी झाली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स ची आता बाजू भक्कम झाली आहे. सौरभ तिवारी च्या जागी तो संघात आला आहे,तर दुसरीकडे आरसीबी ने संघात तब्बल तीन बदल केले आहे. सैनी,हसरंगा व डेव्हिड यांना बाहेरचा रस्ता करून शाहबाज अहमद,डॅनियल ख्रिश्चन व कायले जेमिसन यांना संघात घेतले आहे. दोन्ही संघात t20 चे मातब्बर खेळाडू आहे, म्हणून एक रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
मुंबई-क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ॲडम मीलने, राहुल चहर, जसप्रीत बुमराह व ट्रेटं बोल्ट.
आरसीबी-विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, श्रीकर भारत, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, शहाबाज अहमद, डॅनियल ख्रिश्चन, कायले जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज व युजवेंद्र चहल.