रोमांचक सामन्यात पंजाब ठरला राजस्थानवर भारी.

आयपीएल मध्ये राजस्थान समोर पंजाबचे आवाहन आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचे निर्णय घेतला होता. मात्र पंजाबच्या कर्णधार धवन आणि प्रभसीमरनसिंग याने राजस्थानचा हा निर्णय सपशेल अपयशी ठरविला. दोन्ही सलामी वीरांनी अर्धशतकी खेळी केल्या.

कर्णधार धवनने सर्वाधिक 86 तर प्रभ सिमरनसिंगने 60 धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक जितेश शर्मानेही 27 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजी मध्ये राजस्थान कडून होल्डर ने सर्वाधिक दोन गडी बाद केला. पंजाबने 20 षटकात एकूण 197 धावा केल्या.

धावांचा पाठलाग करीत असताना राजस्थानी सलामी जोडीमध्ये थोडा बदल केला. जायबंदी झाल्यामुळे स्फोटक फलंदाज बटलर सलामीला आला नाही. अश्विन व जयस्वाल हे लवकर बाद झाले. शानदार फॉर्मात असलेला बटलर ही लवकर बाद झाला. कर्णधार सॅमसनने सर्वाधिक 42 धावा केल्या. हेटमायेर आणि जुरेल प्रत्येकी 36 आणि 32 धावांचे योगदान दिले.

पंजाब कडून एलिस सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्यांनी चार गडी बाद करत सामनावीर ठरला. शेवटच्या षटकात 16 धावांची आवश्यकता असताना सैम करनणे केवळ दहा धावा देऊन संघाला विजय मिळवून दिला. आतापर्यंतच्या आयपीएलच्या सर्व सत्रांपैकी फक्त तीन वेळेस पंजाबने सुरुवातीचे दोन सामने जिंकले आहे.

उद्या कोलकाता समोर बेंगलोरचे आवाहन असणार आहे.

You might also like

Comments are closed.