बंगळूरु – एम. चिन्नास्वामीच्या अवघड खेळपट्टीवर दोन्ही डावांत अर्धशतके साकारणाऱ्या श्रेयस अय्यरचे (९२ आणि ६७) कर्णधार रोहित शर्माने कौतुक केले. “श्रेयसने ट्वेन्टी-२० पाठोपाठ कसोटी मालिकेत सर्वांना प्रभावित केले.
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या खेळाडूंची जागा घेणे सोपे नाही. मात्र श्रेयसने गमा चांगली कामगिरी केली. त्याच्यात खूप क्षमता असून परदेशात खेळल्यानंतर त्याच्या खेळात अधिक सुधारणा दिसून येईल, असे रोहित म्हणाला. तसेच सांघिक कामगिरीमुळेच श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने निर्भेळ यश संपादले, असे मतही रोहितने व्यक्त केले.
रवींद्र जडेजाने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी (२ केली. तो अप्रतिम गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकही आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय संघाला अधिक बळकटी मिळते. ऋषभ पंतच्या खेळात दिवसेंदिवस सुधारणा होत असून त्याने या मालिकेतही महत्त्वाचे योगदान दिले. अश्विनला मी सर्वकालीन महान खेळाडू मानतो. त्याच्या हातात चेंडू सोपवल्यावर तो बळी मिळवणार याची आम्हाला खात्री असते,असेही रोहितने सांगितले.