औरंगाबाद (प्रतिनिधी)महिला सशक्त असतील, तर देशाची भावी पीढी सशक्त बनतो. महिला-मुलींनी एक तरी खेळ खेळायला हवे आणि आपल्या मुलांना देखील मैदानावर पाठवायला हवे, असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाठ यांनी केले. शिवसेना क्रीडा आघाडीतर्फे विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील ३८ महिला-मुलींचा आमदार संजय शिरसाठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत हाेते. यावेळी सुरेश मिरकर, राहुल टाक, मनजीत दरोगा, निखिल पवार, चरणजीत सिंग संघा, आयोजक विनोद माने यांची उपस्थिती होती.
सत्कारमुर्ती :
अंजली शिरसिकर, माधुरी कदम, छाया मिरकर, मंदा कड, डॉ. मीनाक्षी मुलीयार, लता कलवार, प्रियंका गारखेडे, श्वेता सावंत, वैदही लोहिया, कशिश भराड, रमा जगताप, मंगल ढोकरट, खुशी डोंगरे, सावनी पटवर्धन, कविता जाधव, अश्विनी मार्कंडे, राधिका अंबे, अंतरा हिरे, राधिका शर्मा, छाया सोमवंशी, स्मिता पठारे, मीना अंबे, ऐश्वर्या जगताप, साक्षी वाघिरे, दीपाली जाधव, कविता खोसे, आदित्य बागुल, राधा शिंदे, अश्विनी धापसे, कल्याणी सोनवणे, मयूरी पवार, अनिता कटकुरी, अॅड. संगीता भट्टड, तनीषा बोरामणीकर, सोनम शर्मा, स्टेला ऊरेल, कल्पना माने.