श्रीलंका चा अष्टपैलू खेळाडू हासारंगा ने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर श्रीलंक सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. दोन सामन्यात दोन विजयासह श्रीलंका चे चार गुण झाले आहे. त्यांचा एक सामना अजूनही बाकी आहे तरी श्रीलंका क्वालिफाय झाली आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा हा सारंगा या सामन्यात सामनावीर ठरला आहे, तर उद्या बांगलादेश समोर पापुआ न्यू जिनेव्हा चे आव्हाण असणार आहे तसेच दुसर्या सामन्यात स्कॉटलंड समोर ओमानचे आवाहन असणार आहे.
आयर्लंड नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांचा हा निर्णय अंगलट पडला. पथुम निसंका व हसारंगाने अर्धशतकी खेळी केल्या. हसारंगाने सर्वाधिक 71 तर निसकांने 61 धावांचे योगदान दिले. श्रीलंका ने 20 षटकात 171 धावांपर्यंत मजल मारली.तर आर्यलँड कडून वेगवान गोलंदाज लिटलने सर्वाधिक चार गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना आर्यलँड ची सुरुवात चांगली राहिली नाही. तब्बल 9 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाही. आर्यन कडून बेलबरीनिने सर्वाधिक 41 धावांचे योगदान दिले, तर कैम्पर ने 24 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजी मध्ये श्रीलंका कडून शिक्षणाने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तसेच कुमार व करुणारत्ने प्रत्येकी दोन गडी बाद केले. फलंदाजीमध्ये कमाल करणाऱ्या हसारंगाने गोलंदाजीमध्ये ही एक गडी बाद केले.