हार्दिक रणजी स्पर्धेत खेळणार नाही ! गांगुलीच्या सूचनेकडे दुर्लक्ष;

नवी दिल्ली  – येत्या काही दिवसान रणजी स्पर्धेत होणार आहे .ज्या खेळाडूंना भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल, त्यांनी स्थानिक स्पर्धेत तंदुरुस्ती सिद्ध करण्यासह चमकदार कामगिरी करावी, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) BBCI अध्यक्ष सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले. परंतु अष्टपैलू हार्दिक पंड्याने याकडे दुर्लक्ष करून आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली आहे.

रणजीच्या साखळी सामन्यांना १० फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून यासाठी बडोद्याने सोमवारी अंतिम २० खेळाडूंची नावे जाहीर केले. भारतीय संघातील स्थान गमावलेल्या हार्दिकचा या यादीत समावेश नाही. केदार देवधरच्या नेतृत्वाखालील बडोदा संघात हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्या मात्र खेळणार आहे.

हार्दिक १०० टक्के तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. तो तंदुरुस्तीवर मेहनत घेऊन गोलंदाजी करेल, अशी आशा आहे. रणजी स्पर्धेत हार्दिकला खेळताना पाहण्यास मी उत्सुक आहे. असे गांगुली गेल्या आठवड्यात म्हणाला.

You might also like

Comments are closed.