आफ्रिका चषक फुटबॉल स्पर्धा : सेनेगल विजयी ;

आफ्रिका – तारांकित खेळाडू सादिओ मानेने पेनल्टी शूटआऊटमध्ये केलेल्या निर्णायक गोलमुळे सेनेगलने इजिप्तला पराभूत केले . तर ९० मिनिटांचा नियमित वेळ आणि ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळानंतर सामन्यात गोलशून्य बरोबरी असल्याने विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट खेळवण्यात आला. यात सेनेगलने ४-२ अशी बाजी मारून ऐतिहासिक अजिंक्यपदावर कब्जा केला.

व्यावसायिक फुटबॉलमध्ये बलाढ्य लिव्हरपूल संघाकडून खेळणारे माने आणि मोहम्मद सलाह या आघाडीच्या खेळाडूंचा अनुक्रमे सेनेगल आणि इजिप्त संघात समावेश असल्याने अंतिम सामन्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

या सामन्यात १२० मिनिटांच्या अखेरीस दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये सेनेगलच्या कालिदू कुलिबाली, अबू डियालो, बाम्बा डिएंग आणि माने यांना चेंडू गोलजाळ्यात मारण्यात यश आले.

You might also like

Comments are closed.