साईच्या सुदर्शनखेळीमुळे गुजरातने दिल्लीला नमविले.

आयपीएल मध्ये गुजरात समोर दिल्लीचे आवाहन आहे नाणेफेक जिंकून गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला. दिल्लीकडून एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. एकाही फलंदाजाने अर्धशतक न केल्यामुळे दिल्लीला 20 षटकात 162 धावापर्यंतच मजल मारता आली. डेव्हिड वार्णर ने 37 तर अक्षर पटेल आणि सरफराज खानने प्रत्येकी 36 आणि 30 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजी मध्ये गुजरात कडून मोहम्मद शमी आणि स्पिनर राशीत खानने प्रत्येकी तीन गडी बाद केले. जोसेफ नेही दोन गडी बात केल्या.

धावांचा पाठलाग करीत असताना गुजरातची सुरुवात चांगली राहिली नाही. शानदार फॉर्मत असलेला सलामीवीर फलंदाज शुभमन गील मात्र या सामन्यात अपयशी ठरला. वृद्धिमान साहा ही लवकर बाद झाला. गुजरातच्या दोन्ही सलामी वीरांनी प्रत्येकी 14-14 धावा केल्या. मात्र नवोदित साई सुदर्शन एकाकी झुंज देत संघाला विजय मिळवून दिला. सुदर्शन ने सर्वाधिक 62 धावा केल्या. तर डेव्हिड मिलरने जलद 31 तर शंकरने ही महत्त्वाचे 29 धावांचे योगदान दिले. तर दिल्लीकडून नोकियाने दोन तर खालील ने एक गडी बाद केला. साई सुदर्शन या सामन्यात सामनावर ठरला. तर उद्या पंजाब समोर राजस्थानचे आवाहन असणार आहे

खालील  TATAIPL 2023 मधील आजची सर्व संघाची गुणतालिका

 

 

 

 

You might also like

Comments are closed.