ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे फिडेच्या एज्युकेशन कमिशनवर

ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांची बुद्धिबळाच्या जागतिक स्तरावरील फिडेच्या एज्युकेशन कमिशनवर सदस्य पदी निवड झाली आहे. याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या वतीने करण्यात आली.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांची बुद्धिबळातील कामगिरी आणि संघटनांवरील विविध पदांवरील कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे त्यांच्याकडे आता एज्युकेशन कमिशन वर सदस्य पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

फिडेच्या वतीने केलेली ही निवड माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. आता जागतिक स्तरावर बुद्धिबळ खेळाला चालना देण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे स्पेशल प्रमोट केले जाणार आहे. याच्या माध्यमातून बुद्धिबळ हा खेळ तळागाळापर्यंत खेळवला जाणार आहे. या कमिशनचे आतापर्यंतचे कार्य कौतुकास्पद ठरलेले आहे. त्यामुळे आता मला नव्याने त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, अशा शब्दात ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी आपल्या निवडीचा आनंद व्यक्त केला.

You might also like

Comments are closed.