राष्ट्रीय बँडी स्पर्धेत महाराष्ट्र टीमला सुवर्णपदक

औरंगाबाद(प्रतिनिधी):बँडी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे गोव्यातील युथ हॉस्टेल येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय बँडी स्पर्धेत महाराष्ट्राच्या ११ व १७ वर्षाखालील संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. राज्य संघात औरंगाबादच्या साई स्केटिंग अकादमीच्या खेळाडूंचा सर्वाधिक समावेश आहे. फायनलमध्ये महाराष्ट्राने तामिळाडून संघाला १-० ने पराभूत करत विजेतेपद मिळवले.
स्पर्धेत १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. संघाला प्रशिक्षक भिकन अंबे यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी खेळाडूंचे बँडी असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव लवकुमार जाधव, नितीन काठोदे यांनी अभिनंदन केले.
विजेत्या संघ ११ वर्ष संघ – श्रवण विकास घोगरे (कर्णधार), पार्थ गोपाळ कुलकर्णी, सार्थक गणेश सोनवणे, चिनमय पाटील. १७ वर्ष संघ – साई भिकन आंबे (कर्णधार), अभिषेक शेळके, सुहर्ष शर्मा, श्रीनाथ शर्मा, अश्विन खांडेकर, पूजा अंबे, वैदेही लव्हारे.
You might also like

Comments are closed.