क्रीडा क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी 11 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यात अलंपिक गोल्डन बॉय नीरज चोप्रासह कुस्तीपटू रवी दहिया, महिला बॉक्सर लोवलीना बोर्गोहेन यांचा समावेश आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी ज्या खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, त्यात भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर श्रीजेश, नेमबाज अवनी लेखारा, पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा सुमित अंतील, प्रमोद भगत, कृष्णा नागर, मनीष नरवाल, मिताली राज आणि सुनील छेत्रि यांच्या नावाचाही समावेश आहे.फुटबॉल क्षेत्रातून खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित होणारा सुनील छेत्री हा पहिला फुटबॉलपटू ही ठरला आहे.
अर्जुन पुरस्कारासाठी एकूण पस्तीस खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यात योगेश कथुरिया, निशांत कुमार,प्रवीण कुमार,शरद कुमार, सुहास एलवाई,सिंघराज अधाना, भावीना पटेल,हरविंदरसिंग,शिखर धवन यांच्यासह भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्व खेळाडूंचा समावेश आहे. हॉकी संघातील गोलकीपर श्रीजेश च्या नावाचा समावेश खेळ रत्न पुरस्कारा च्या यादीत आहे.