दुबई-गुरुवारी टी20 वर्ल्ड कप मध्ये एक सामना होता. यामध्ये ऑस्ट्रेलियासमोर श्रीलंकेचे आवाहन होते. यामध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा सात विकेट्सनी दनदनीत विजय मिळविला आहे. या विजयासह सह ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा विजय मिळविला आहे तसेच पॉईंट्स टेबल मध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.चार षटकांत मात्र 12 धावा देऊन दोन महत्त्वाचे गडी बात करणारा लेग स्पिनर ॲडम झाम्पा सामनावीर ठरला. उद्या वेस्टइंडीज समोर बांगलादेश व पाकिस्तान समोर अफगाणिस्तानचे आव्हान असणार आहे.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कुशल परेरा, असालंका, राजापक्षा यांच्या या शानदार पण छोट्या खेळीच्या बळावर श्रीलंका कशीबशी 154 धावांपर्यंत मजल मारू शकली. श्रीलंका कडून असलंकाणे सर्वाधिक 35 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क, झंपा, कमिन्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली राहिली. फॉर्ममध्ये नसलेला वारनर या सामन्यात चमकला. त्याने सर्वाधिक 65 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार फिंचने 37 तर स्मित ने 28 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून हसारंगाने सर्वाधिक दोन गडी बाद केल्या.