औरंगाबाद-सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया 18 व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पुणे आळंदी येथे पार पडणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या 35 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील पूजा भिकन अंबे जूनियर मुली या वयोगटात व श्राव्या यादव इलाईट वुमन या वयोगटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील. महाराष्ट्र संघाने गत स्पर्धेत उपविजेते जिंकले होते.यजमान संघाला या स्पर्धेत मोठ्या संख्येत पदके जिंकण्याची संधी आहे याशिवाय संघामध्ये गुणवंत खेळाडूंचा समावेश आहे त्यामुळे टीम इंचा पथकांचा दावा मजबूत मानला जात आहे
औरंगाबादच्या क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन घोगरे, खुलताबाद सायकलींग असोसिएशन चे अध्यक्ष गणेश नाना आधाने, आयनमॅन तीन घोरपडे,प्रफुल जटाळे,अभय देशमुख,अमृत बिराडे, यांनी अभिनंदन केले. पुजा अंबे व श्राव्या यादव या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील अशी आशा मार्गदर्शक भिकन अंबे यांनी व्यक्त केली.