यावलपिंप्री तांडा येथील कबड्डी स्पर्धेत औंढा नागनाथ संघाने पटकावला प्रथम पुरस्कार

जालना(प्रतिनिधी)-घनसावंगी तालुक्यातील यावलपिंप्री तांडा येथे रविवारी खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये औंढा नागनाथ संघाने प्रथम पुरस्कार पटकावला.या स्पर्धेचे उद्घाटन यशवंत सहकारी सुतगिरणीचे चेअरमन आबासाहेब वरखडे यांच्या हस्ते करण्यात आले. केसूला क्रीडा मंडळ व नानाभाऊ उगले मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वियजी संघांना आबासाहेब वरखडे व नानाभाऊ उगले यांच्या तर्फे प्रथम 15 हजार रुपये, दिनकरराव शिंदे यांच्या वतीने द्वितीय 9 हजार रुपये, अरुणराव मोरे व परमेश्वर जाधव यांच्या वतीने तृतीय 5 हजार रुपये व संजय राठोड यांच्या वतीने चतुर्थ 3 हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात आले.

या स्पर्धेत औंढा नागनाथच्या संघाने प्रथम, दह्या तांडा संघाने द्वितीय, जालना संघाने तृतीय व चतुर्थ पुरस्कार पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन यशवंत सहकारी सुतगिरणीचे चेअरमन आबासाहेब वरखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य नानाभाऊ उगले, पोलिस उपनिरीक्षक प्रदिप डोलारे, राजेश राठोड, भारत देवकर, बळीराम महाराज यादव, आदी उपस्थित होते. विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वाटप करण्यात आले. स्पर्धेला पाहण्यासाठी दर्शकांनी फूल गर्दी केली होती. दर्शकांना रोमांचक कुस्ती पाहायला मिळाली.

You might also like

Comments are closed.