सुसाट दबंग दिल्लीकडून पाटणा पायरेट्सचा पराभव!

प्रो कबड्डी लीगच्या (PKL 2021) ६२व्या सामन्यात, दबंग दिल्लीने पाटणा पायरेट्सचा ३२-२९ असा पराभव केला. दबंग दिल्लीचा ११ सामन्यांमधला हा सातवा विजय आहे, तर पायरेट्सचा ११ सामन्यांमधला तिसरा पराभव आहे. पूर्वार्धानंतर दबंग दिल्लीचा संघ १९-१० ने पुढे होता आणि त्यांनी चांगली आघाडी घेतली होती. दबंग दिल्लीने चमकदार कामगिरी करत ११व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सला ऑलआऊट केले.

दुसऱ्या हाफच्या पहिल्या १० मिनिटांत पाटणा पायरेट्सने जबरदस्त पुनरागमन केले आणि स्कोअर २१-२२ असा केला. विजयने सुपर रेड करत दिल्लीची आघाडी वाढवली, जी अखेरीस निर्णायक ठरली. या सामन्यात विजयने दबंग दिल्लीसाठी ९ गुण घेतले, तर संदीप नरवालने सामन्यात ८ गुण घेतले. पाटणा पायरेट्ससाठी, नीरजने बचावात चांगली कामगिरी केली आणि ४ टॅकल पॉइंट्स घेतले, परंतु एकाही खेळाडूला चढाईत चांगली कामगिरी करता आली नाही आणि हेच पराभवाचे मुख्य कारण ठरले.

दुसऱ्या सामन्यात यू मुंबाने गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात २४-२४ अशी बरोबरी राखली. पहिल्या सत्रात आघाडी घेतलेल्या गुजरातने दुसऱ्या सत्रात संथ खेळ केला. प्रत्युत्तरात पिछाडीवर पडलेल्या यू मुंबाने आपली आघाडी वाढवली. यू मुंबाकडून व्ही. अजित कुमारने ८ गुण घेतले. तर रिंकूने बचावात उत्तम कामगिरी करत ५ गुण घेतले. गुजरातकडून अजय कुमारने ७ गुण घेतले.

You might also like

Comments are closed.