औरंगाबाद- बुधवार 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी उदघाटन पार पडले, यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख व उदघाटक जिल्हा परिषद सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, अविनाश अशोकराव गलांडे, औरंगाबाद, संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश कड, आयोजन समितीचे सह-सचिव सचिन तत्तापुरे, तांत्रीक समितीचे प्रमुख प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, राजु कनिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश कड यांनी केले तर, कार्यक्रमाचे प्रमुख व उदघाटक सभापती, शिक्षण व आरोग्य समिती गलांडे यांनी बास्केटबॉल रिंगमध्ये टाकून औपचारिक उदघाटन झाले असे जाहीर केले.