टी-20 वर्ल्ड कप ला सुरुवात झालेली आहे.यामध्ये बांगलादेश समोर स्कॉटलंड आव्हान होते. तर स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा आश्चर्यकारक पराभव झाला आहे. दूबळ्या स्कॉटलांड ने बांगलादेशचा सहा धावांनी निसटता पराभव. 28 चेंडूत 45 धावा करणारा क्रिस ग्रीव्हस सामनावीर ठरला.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय सार्थ ठरविला. स्कौटलैंडचे फलंदाज एकापाठोपाठ लवकर तंबूत परतले. तळाला क्रिस ग्रीव्सने 45 धावा करून संघाला 140 धावा पर्यंत समान धारक स्कोर पर्यंत नेले. बांगलादेश कडून मेहंदी हसन ने सर्वाधिक तीन गडी बाद केले. शाकिब नेही दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना बांगलादेशची हि सुरुवात चांगली राहिली नाही. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या बांगलादेश मध्ये एकही खेळाडू अपेक्षानूरूप प्रदर्शन करू शकला नाही.त्यामुळे बांगलादेशला स्कॉटलंड सारख्या दुबळ्या संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. बांगलादेश कडून रहीम ने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर स्कॉटलैंड कडून व्हीलणे सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर उद्या आयर्लंड समोर नेदरलॅंडचे व श्रीलंका समोर नामिबिया चे आवाहन असणार आहे.