टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक करण्यात आली आहे. हरियाणाच्या हांसी मधील हिसार पोलिसांनी ही कार्य कारवाई केली. लाईफ सेट मध्ये केलेल्या एका चुकीमुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. या बातमीने क्रीडा विश्वात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
युवराज सिंगने गेल्यावर्षी एका लाईव्ह चॅट मध्ये अनुसूचित जाती बद्दल अपशब्द वापरल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक वृत्तसंस्था पंजाब केसरी मधून हे वृत्त समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी अटक करून त्याला सोडून दिले आहे.युवराज सिंग ने गेल्या वर्षी एका लाईव्ह चॅट मध्ये अनुसूचित जाती बद्दल अपशब्द वापरल्याने त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. युवराज सिंगने या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवला असून, कोर्टाने युवराजला तपासामध्ये सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.
युवराज सिंग यांनी अनुसूचित जाती विरुद्ध अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शब्द वापरले होते.त्यामुळे दलित हक्क कार्यकर्ते रजन कलसन यांनी त्याच्या विरोधात एससी एसटी कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली हांसि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. युवराज सिंह ने हा खटला निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ज्यावर उच्च न्यायालयाने युवराजला अटकपूर्व जामीन दिला. दरम्यान, युवराज सिंह याच प्रकरणात आज आपल्या सहकाऱ्यांसह हिसार मध्ये पोहोचला होता. युवराज सिंगने कोर्टात आपली चूक कबूल केली होती. आपल्याकडून नकळत ही चूक झाल्याचं युवराजने कोर्टात सांगितलं होत.