संभाजीनगर(प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचनालय आयुक्त सुहास दिवसे यांनी ६ वादग्रस्त खेळांच्या अधिकृत राज्य क्रीडा संघटनांची माहिती विहित नमुन्यात सादर करण्याबाबत महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांना पत्र पाठवून माहिती मागविली होती. मात्र, ‘एमओए’ सचिवांनी संघटनांमधील न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांची माहिती देणे टाळून काही खेळ संघटनांच्या बाबतीत अपुरी व चुकीची माहिती दिली आहे, तसेच वादग्रस्त खेळ संघटनांचे विषय तक्रार समिती समोर ठेवा असे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले तरीही संबंधित तायक्वांदो असोसिएशनचे प्रकरण तक्रार निवारण समितीकडे न देता मनमानी कारभार सुरू आहे . राज्यात १ जानेवारी पासून आयोजित होणार्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या सहा खेळ संघटनेतील वाद बाजूला ठेवून दोन्ही संघटेच्या खेळाडूंमध्ये निवड चाचणी घेऊन यांच्या मधून निवडलेल्या चांगल्या खेळाडूंना “मिनी ऑलिम्पिक” मध्ये खेळण्याची संधी देणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहेत.
सहा खेळ संघटना मधील वादामुळे क्रीडा व युवक सेवा संचनालय आयुक्तांनी महासचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांना ८ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर व ९ डिसेंबर रोजी, असे तीन पत्र पाठवलेली आहेत. यामध्ये बास्केटबॉल, व्हालीबॉल, कयाकिंग, कनोईग, तायक्वांदो, कराटे व किकबॉक्सिंग खेळांच्या संघटनांची माहिती मागविण्यात आलेली होती. या खेळा संघटनांमध्ये वाद असताना, त्यांनी क्रीडा संचालकांना ‘एमओए’चे सचिव या नात्याने पत्र पाठवून ‘एमओए’ला संलग्न असलेल्या संघटनांना शालेय क्रीडा स्पर्धा देण्याची मागणी केली होती. तायक्वांदोच्या तांत्रिक जबाबदारी ज्या संघटनेला देण्यात आली त्या, संघटनेकडे पुरेसे पंच, किंवा मनुश्यबळ नसतानाही काही जिल्ह्यांमध्ये त्यांनी स्पर्धा कशाबशा उरकण्याचा तत्परता दाखवली तर अमरावती, गोंदिया, यवतमाळ अशा अनेक ठिकाणी स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की आली, अनेक ठिकाणी स्पर्धांमध्ये वादविवाद, गोंधळ, अनियमितता दिसून आली. तर, काही ठिकाणी तायक्वांदोची शालेय स्पर्धा चक्क बॉक्सिंग रींग मैदानात घेण्यात आली.
यामुळे संचालनालाच्या भूमिकेवर ही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या अनुषंगाने क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी उपरोक्त सहा क्रीडा प्रकारांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला माहिती मागितली. यामध्ये अधिकृत राज्य क्रीडा संघटना कोणती, परंतु आयुक्तांनी दोन ते तीन पत्र पाठवूनही त्यांना विहीत नमुन्यात माहिती देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अकार्यक्षम खेळ संघटनांना का पाठीशी घालत आहे? शासन, क्रीडा विभाग यांच्या पेक्षा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला जास्त अधिकार आहेत का? खेळाडूंना ऑलिम्पिक ची स्वप्न दाखवणाऱ्या महाराष्ट्र ऑलिंपिक ला याच महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गुणवंत खेळाडू या राजकारणामुळे “मिनी ऑलिम्पिक” पासून दूर सारले जात असल्याचे दिसत नाहीत का ?
‘अधिकृत संघटनेच्या चौकशीसाठी लवकरच बैठक’
अनेक पाठपुरावे, तसेच ‘एमओए’चे अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशानंतर सचिवांनी या सहा खेळांच्या अधिकृत संघटनांच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची एक समिती नेमण्यात आली असून, या समितीच्या सदस्यांना कराटे डो असोसिएलन ऑफ महाराष्ट्र संघटनेने अधिकृत कागद पत्रांची माहिती मेलवर पाठविली. मात्र, त्यावेळी त्यांना आपण या समितीत असल्याचे माहितच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या चौकशीसाठी लवकच बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले, असल्याची माहिती कराटे असो.च्या सदस्यांनी सांगितले.
‘एमओए’ने चुकीच्या संघटनेला दिली मान्यता
‘एमओए’ची राज्यातील खेळ संघटनेला मान्यता देण्यासाठी जी नियमावली बनविण्यात आलेली आहे. त्यामध्ये ज्या राज्य संघटनेला राष्ट्रीय संघटनेची मान्यता असेल, तसेच तिला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता असेल, तरच त्या राज्य संघटनेला मान्यता दिली जाते. त्या राज्य संघटनेला सलग तीन वर्षे मान्यता असणे आवश्यक आहे आणि जी राष्ट्रीय संघटना जागतीक संघटनेशी सलग्न आहे, तिच राष्ट्रीय संघटना अधिकृत समजली जाते. परंतु, ‘एमओए’ सचिवांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवून चुकीच्या कराटे संघटनेला मान्यता दिली आहे, असे अंतराष्ट्रीय कराटे प्रशिक्षका संगीता जावध यांनी सांगितले.
कराटे टो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही संघटना राज्याचे अध्यक्ष सलाउद्दिन अन्सारी आणि सचिव संदीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कार्यरत आहे. या पदाधिकार्यांनी दोन महिन्यापासून वेळोवेळी सर्व अधिकृत कागद पत्रे दिलेली आहेत. परंतु, यावर काहीही कार्यवाही घेतलेली नाही. ‘एमओए’चे सचिव नुसते वेळकाढू पणा करता आहेत.‘एमओए’च्या अध्यक्ष अजित पवार व क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांना भेटून वेळोवेळी विनंती केली आहे. कराटे डो असोसिएशन एमओएची सर्व गोष्टींवर खरी उतर असून, आमची इतकीच मागणी आहे की, योग्य त्या संघटनेला मान्यता द्यावे.
– संगीता जावध, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षका
तायक्वांदो खेळाच्या राज्य संघटनेची चुकीची माहिती क्रीडा आयुक्तांना ‘एमओए’ सचिवांनी दिलेली असून, या संघटनेच्या योग्य खेळाडूंवर एक पत्रकारे अन्यायच होत आहे. वेळोवेळी राज्य संघटनेने क्रीडा आयुक्त, तसेच ‘एमओए’च्या अध्यक्षांची भेट घेऊन अधिकृत कागद पत्रे दिलेली असतना, सचिव मात्र चुकीच्या संघटनेला पाठीशी घालण्याचा प्रत्यन करत आहे. मिनी ऑलिम्पिकमध्ये चांगल्या खेळाडूंना संधी मिळावी अशी आमची प्रमाणीक भूमिका आहे. यामुळे आम्ही दोन्ही संघटनेतील वाद बाजूला ठेऊन दोन्ही संघटनेच्या खेळाडूंमध्ये निवड चाचणी स्पर्धा घेऊन विजयी खेळाडूंनाच मिनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी द्यावी, तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेला मान्यता असून, या संघटनेची राज्यात तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेला मान्याता असताना, या संघटनेला डावलणे एक पत्रकारे या संघटनेतील खेळाडूंवर अन्यायच नाही का?
– मिलिंद पठारे,
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई