नागपूर- अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना धनुर्विद्या मध्ये भरघोस पदकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे राष्ट्रीय प्रशिक्षक व महाराष्ट्राचे व्यवस्थापक रंगराव साळुंखे यांनी सांगितले की, रिकर्व्ह या क्रीडा प्रकारातील वैयक्तिक विभागात पार्थ साळुंखे, मंजिरी आलोणे यांच्याकडून पदकाची खात्री आहे. तसेच पुरुष व महिला या दोन्ही गटाच्या सांघिक विभागातही महाराष्ट्र पदक मिळवेल.
कंपाउंड विभागात दोन्ही विभागात सांघिक सुवर्णपदक मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे उत्सुक आहेत. वैयक्तिक विभागात विश्वविक्रम करणारा ओजस देवोतळे व अदिती स्वामी यांच्यावर मोठी भिस्त आहे. इंडियन फिटा विभागात विवेक तरूणे याच्याकडून वैयक्तिक कौशल्य गटात सोनेरी कामगिरीची अपेक्षा आहे तर महिलांमध्ये सांघिक विभागात महाराष्ट्राच्या खेळाडू सुवर्णपदक जिंकू शकतील.
महाराष्ट्र संघाबरोबर शुभांगी रोकडे, प्रतिक थेटे, ज्ञानेश्वर थेटे, मोहम्मद झिशान , श्री. साळुंके , स्वप्नील भुयार यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे खेळाडू नागपूर येथून मंगळवारी अहमदाबादला रवाना झाले.