औरंगाबाद (प्रतिनिधी):- दुसऱ्यांदा सुरु झालेल्या शुक्रवार दि ७ जानेवारी रोजी पासुनच्या दुसऱ्या दिवशीच्या चौकशी दरम्यान महानगरपालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये क्रीडा साहित्याच्या मूळ यादीवर बनावट यादी चिटकावण्यात आली असल्याचे आढळून आले आहे .या प्रसंगी चौकशी अधिकारी उपसंचालक सुहास पाटील ,उपसंचालक उर्मिला मोराळे उपस्थित होते .
तसेच या प्रस्तावामध्ये फक्त एकच शाळा नसून मंजूर करण्यात आलेल्या ४३ मनपा हद्दीमधील शाळा आहेत . सर्व प्रथम मनपा शाळेची यादी तयार करण्यात आली त्या यादीवर प्रस्ताव न घेता मंजुरी करून घेण्यात आली नंतर महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रस्ताव मागवण्यात आले.त्यामध्ये मनपा शाळेकडून मागवण्यात आलेल्या क्रीडा सहित्याची यादी न देता जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या सोयीनुसार क्रीडा साहित्याची यादी चिटकावण्यात आली.
जसे कि ४थी पर्यंत प्राथमिक शाळांना क्रिकेटच्या साहित्यामध्ये क्रिकेट मॅट,कबड्डी मॅट यांसाठी पुरेपूर जागा नसतांना त्याठिकाणी हे साहित्य मंजूर करण्यात आले व ज्या आवश्यक साहित्यांची यादी मनपा शाळेमार्फत देण्यात आली होती.जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी यादीमध्ये तफावत यादी मनपा शाळेच्या लेटर हेडवर चिटकावण्यात आली.
नवीन शासकीय विश्रामगृहात क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी क्रीडा व युवक सेवा संचनालय ओमप्रकाश बकोरीया आणि क्रीडा अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली . बैठकी नंतर केदार बोलताना म्हणाले औरंगाबाद येथील साहित्य वितरणात घोटाळा झाला असल्याचा तक्रार अर्ज शाम भोसले यांनी मंत्रालयात दिला होता . या अर्जाची दखल घेऊन डिसेंबर महिन्यात तीनसदस्यीय समिती नेमण्यात आली होती .या समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही . मात्र ,जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी ज्या सहा शाळा अस्तित्वातच नाहीत , त्यांना व्यायामाचे साहित्य दिले असल्याचे समोर आले आहे .दोन्ही चौकशीचा अहवाल संयुक्तपणे मिळणार आहे . त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल.
या विषयी तक्रारकर्ते शाम भोसले सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांना संपर्क साधला असता ते बोलतांना म्हणाले कि ,क्रीडा मंत्र्यांनी दिलेल्या कालच्या प्रतिक्रियेनुसार निलंबन होणार आहेच पण त्यानंतर झालेल्या अफरातफरिची वसुली करण्यात यावी व त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
हे तर फक्त मनपा शाळेमधील प्रस्ताव समोर आला आहे अजून औरंगाबाद मनपा हद्दी व्यतिरिक्त प्रस्तावामध्ये गैरव्यवहार घडल्याची शक्यता आहे .