औरंगाबाद(प्रतिनिधी); औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय सब-ज्युनिअर सॉफ्टबॉल निवड चाचणीचे आयोजन आज दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी ठीक 4:00 वाजता गरवारे क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे.
1 जानेवारी 2006 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी निवडचाचणी साठी उपस्थित राहावे, अधिक माहिती साठी संपर्क प्रा. गणेश बेटूदे 8788650460 यांच्या सोबत साधावा असे आवाहन औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ.फुलचंद सलामपुरे,डॉ उदय डोंगरे सचिव गोकुळ तांदळे यांनी केले आहे.तसेच या चाचणी मध्ये निवड झालेले खेळाडु हे औरंगाबाद येथे दिनांक 11 व 12 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या राज्य सॉफ्टबॉल निवड चाचणी साठी पात्र होतील.