प्रो कबड्डी लीगच्या (PKL8) सामन्यात रेडर विकास कंडोलाच्या नेतृत्वाखाली हरयाणा स्टीलर्स संघाला गुजरात जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला. अजय कुमार आणि प्रदीप कुमार यांच्या चमकदार कामगिरीमुळे गुजरातने चौथ्या विजयाची नोंद केली आणि हरयाणाचा ३२-२६ असा पराभव केला. अजय कुमारने ११ आणि प्रदीपने १० गुण मिळवले.
या सामन्यात गुजरातने सुरुवातीपासूनच चांगला खेळ दाखवला. बचावपटू सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली गुजरातने पूर्वार्धातच ७ गुणांची आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये गुजरातने १९ मिळवले. तर हरयाणा संघ १२ गुण जमा करू शकला. उत्तरार्धात हरयाणाने पुनरागमन करत १४ गुण मिळवले, तर गुजरात संघाला या कालावधीत केवळ १३ गुण मिळू शकले. हरयाणा संघाला १५ सामन्यांत सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुणतालिकेत हरयाणा चौथ्या स्थानावर आहे. तर, गुजरात जायंट्स संघ ३३ गुणांसह ११व्या क्रमांकावर आहे.
Comeback to savour for the Giants 💥
Pardeep and Ajay led the raiding attack in this must-win #SuperhitPanga for Manpreet's men!#HSvGG #VIVOProKabaddi @GujaratGiants pic.twitter.com/HXg6iRjGcG
— ProKabaddi (@ProKabaddi) January 31, 2022
प्रो कबड्डीमधील आजचा दुसरा सामना यू मुंबा आणि दबंग दिल्ली यांच्यात रंगला. अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी दिल्लीने सामना आपल्या बाजूने फिरवत यू मुंबाला ३६-३० अशी मात दिली. सामना संपण्यासाठी दोन मिनिटे शिल्लक असताना मुंबाचा संघ ऑलआऊट झाला आणि दिल्लीला ३ गुण मिळाले.
या सामन्यात दिल्लीच्या विजय मलिकने १२ तर आशु मलिकने ८ गुणांची कमाई केली. मनजीत चिल्लरने अप्रतिम बचाव करत ४ गुण घेतले. दुसरीकडे यू मुंबाकडून अभिषेक सिंगने ८ तर शिवमने ६ गुण घेतले.
.@DabangDelhiKC 2️⃣-0️⃣ @umumba
Dabang Army get the better of Sultan and co. in a thrilling encounter 💥#DELvMUM #VIVOProKabaddi #SuperhitPanga pic.twitter.com/Oaj8WbjUAZ
— ProKabaddi (@ProKabaddi) January 31, 2022