जागतिक दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचे उद्घाटन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

आयटी क्षेत्रामध्ये विकास होत असताना आपण आपल्या मातीपासून दूरावत चाललो

नवी मुंबईतील जागतिक दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटनाप्रसंगही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघसुद्धा या स्टेडियममधून दरारा निर्माण करणारा व्हायला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली आहे. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, आदिती तकटरे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि तसेच सिडकोचे अधिकारीही उपस्थित होते.

 

 

 

“आजचा हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री म्हटल्यानंतर राज्यासाठी कामे करणे येतेच. पण ही रस्ते, पाणी ,धरणे आणि इतर कामे करत असताना आपण एका गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करतो असं मला नेहमी वाटतं. जगावं कसं हेच आपण विसरून जातो. जगण्यासाठी खेळाची गरज आहे. हल्ली मैदानी खेळ मागे पडत चालले होते त्यांना आपण प्रोत्साहन देत आहोत. आयटी क्षेत्रामध्ये विकास होत असताना आपण आपल्या मातीपासून दूरावत चाललो आहोत. त्यामुळे आता आपण ज्या मातीपासून आपलं नातं तुटतं चाललं होतं ते आता आपण पुन्हा जोडतो आहोत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

“आपल्या पिढीमध्ये क्रिकेडचे वेड होते. पण आता फुटबॉलचे प्रेम आणि आवड फार झपाट्याने वाढत चालली आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी हे वाढणारे वेळ ओळखून ही सुविधा निर्माण केली आहे. एखादी जागा मोकळी आहे म्हटल्यावर पटकन तिथे विकासक येऊन टॉवर बांधून मोकळा झाला असता. पण तसे होऊ दिले नाही. मी म्हटल्याप्रमाणे आरोग्यदायी जीवनासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

 

“सगळ्या खेळांच्या सुविधा एका ठिकाणी उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. आमच्यावेळी गल्लीमध्ये क्रिकेट खेळाचे ते कधी मेन रोडवर आलेच नाही. माझ्या वेळेच्या अनेकांना वाटायचं की आपण क्रिकेटपटू व्हावं पण संधी नव्हती. मी स्वतः तेजस ठाकरे यांच्यासोबत परदेशातल्या फुटबॉल सामन्यासाठी गेलो होतो. त्यावेळी स्टेडियमध्ये मी आणि फक्त रेफरीचं (पंच) निष्पक्ष होतो. कारण मला आजही फुटबॉलमधले काहीच कळत नाही. फुटबॉल हा पायाने खेळायचा जरी खेळ असला तरी त्याच्यामध्ये डोकं वापरावं लागतं. इतक्या वेगाने हा खेळ खेळावा लागतो आणि त्यासाठी वेगानेच विचार करावा लागतो.

 

 

 

माझी इच्छा अशी आहे की, फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघसुद्धा या स्टेडियममधून दरारा निर्माण करणारा व्हायला पाहिजे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची टीम कधी अर्धवट काम करणार नाही याची मला खात्री आहे आणि त्या कामाला सरकार नुस्ती मदत नाही तर प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही. फुटबॉलमधले जास्त काही कळत नसल्यामुळे उगाच काही अज्ञान प्रकट करु इच्छित नाही,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

You might also like

Comments are closed.