छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चंदिगड या ठिकाणी झालेल्या भारतीय संघाच्या निवड चाचणी मध्ये शहरातील २१ खेळाडूंनी भारतीय संघामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे या स्पर्धा वरिष्ठ गट,ज्युनिअर गट व सब ज्युनिअर गट या तीन वयोगटांमध्ये घेण्यात आल्या होत्या. ३ सप्टेंबर २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ यादरम्यान पटाया थायलंड या ठिकाणी होणार आहेत.भारताचा संघ . या स्पर्धेसाठी डॉ.मकरंद जोशी यांची तांत्रिक समिती तज्ञ म्हणून निवड झाली आहे.
तसेच या स्पर्धे साठी पंच म्हणून अमेय जोशी यांची निवड करण्यात आली आणि संघासोबत प्रशिक्षक म्हणून ईशा महाजन यांची निवड झाली आहे. ७ व्या एशिया एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे.
वरिष्ठ गट
१) धैर्यशील देशमुख – ग्रुप व एरोडान्स,२) संदेश चिंतलवाड – ग्रुप व एरोडान्स, ३)उदय मधेकर – ग्रुप व एरोडान्स,४) राम अर्जुन- ग्रुप व एरोडान्स,५) प्रेम बनकर- ग्रुप व एरोडान्स,६) विजय इंगळे- एरोडान्स,७) सिल्वी शहा-एरोडान्स,८) सायली वझरकर-एरोडान्स,९) साक्षी डोंगरे-एरोडान्स
ज्युनियर गट
१) आर्य शहा – IM, ग्रुप,२) स्मित शहा -मिश्र तिहेरी, ग्रुप ३) देवेश कातनेश्वर कर -मिश्र तिहेरी, ग्रुप ४) अद्वैत वझे -मिश्र तिहेरी, ग्रुप ५ ) राधा सोनी -मिश्र दुहेरी, ग्रुप
सब ज्युनियर
१) अनिकेत चौधरी – IM,मिश्र दुहेरी २) गौरी ब्राह्मणे-मिश्र दुहेरी ३) विश्वेश पाठक-मिश्र तिहेरी, ग्रुप ४) अनुराग देशमुख -मिश्र दुहेरी, ग्रुप ५) रिया नाफडे -मिश्र दुहेरी, ग्रुप ६) गीत भालसिंग- ग्रुप ७) सान्वी सौंदळे.
या सर्व खेळाडूं, प्रशिक्षक पंच यांची भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. स्पर्धेकरिता महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी, उपसंचालक भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग नितीन जैस्वाल, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचलनालय औरंगाबाद विभाग सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे,जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ.सागर कुलकर्णी,डॉ.विशाल देशपांडे, संदीप गायकवाड,राहुल तांदळे,रोहित रोंघे,डॉ.राहुल श्रीरामवर,मनीष थट्टेकर,भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, राज्य शासन क्रीडा मार्गदर्शक तनुजा गाढवे.यांनी पंच प्रशिक्षक व खेळाडू यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.