छत्रपती संभाजीनगर मुलींच्या संघाला उपविजेतेपद

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी):  क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 14 वर्षाखालील शालेय राज्य सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा दि. 15 ते 17 मार्च 2023 दरम्यान करण्यात आलेल्या होत्याव अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागातील सांगली जिल्हा U14 मुलीच्या संघाने छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 5-0 होमरनने हरवले.

या सामन्यात स्नेहल पाटील, समीक्षा खराटे यांनी उत्कृष्ट हिटींग केली तसेच कांचन कुबडे व वैष्णवी भोंडे यांनी उत्कृष्ट पिचिंग केली.या राज्य शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल सचिव गोकुळ तांदळे,गणेश बेटूदे,सागर रूपवते,अक्षय बिरादार, संतोष आवचार,सचिन बोर्डे रोहीत तुपारे,यश थोरात यांनी शुभेच्छा दिल्या.

14 वर्ष मुली संघ
वैष्णवी भोंडे, स्नेहल पाटील
कांचन कुबडे,भूमिका परांडे
निशा गरड,समीक्षा खराटे
अदिती सरवटे,आचल हिवराळे,सायली तांदळे
अभया जाधव.

तसेच या संघाला क्रीडा विभाग प्रमुख ज्योती रत्नपारखी(गायकवाड), मयुरी चव्हाण, ईश्वरी शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

You might also like

Comments are closed.