चेन्नईने उडविला मुंबई इंडियन्स चा धुव्वा

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. दुसरे पर्व दुबईमध्ये खेळविले जात आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आमने-सामने होते. यामध्ये चेन्नईने मुंबई इंडियन्सचा धुवा उडवत शानदार विजय मिळविला आहे. 88 धावा करणारा ऋतुराज गायकवाड सामनावीराचा मानकरी ठरला. तसेच ड्वेन ब्रावो नेही 23 धावा व तीन गडी अशी अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयाला हातभार लावला. मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कायरान पोलाड् संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे रोहित शर्मा व हार्दिक पांड्या ची कमी मुंबई इंडियन्स ला चांगलीच भासली आहे.तर अनमोल प्रीत सिंग या खेळाडूने आयपीएल मध्ये पदापर्ण केले. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने आयपीएल 2019 च्या दुसऱ्या पर्वामध्ये विजयी सुरुवात केली आहे

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत असताना चेन्नईचीही सुरुवात चांगली झाली नाही. 24 धावा वर त्यांचे चार महत्त्वाचे फलंदाज बाद झाले होते. मात्र चेन्नईचा महाराष्ट्रीयन सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या 88 धावांच्या बळावर चेन्नईने 157 धावांपर्यंत मजल मारली होती. धावांचा पाठलाग करीत असताना मुंबई इंडियन्स ची सुरुवात चांगली झाली नाही. सर्कल मध्येच त्यांचे तीन महत्त्वाचे खेळाडू तंबूत परतले होते. डावखुरा फलंदाज सौरभ तिवारी याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला योग्य तशी साथ मिळाली नाही. त्याची एकाकी झुंज अपयशी ठरली. त्याने संघाकडून सर्वाधिक पन्नास धावा करत अर्धशतक पूर्ण केले.चेन्नई कडून दीपक चहर ने मुंबई इंडियन्सच्या दोन्ही सलामी वीरांना बाद करत संघाला चांगली सुरुवात करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. उद्या कोलकाता समोर बैंगलोर चे आवाहन असणार आहे.

You might also like

Comments are closed.