इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी ब्लास्ट या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मध्ये केंट संघाने समर सेट चा पराभव करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. केंट मे समर सेटचा पंचवीस धावांनी पराभव करत सामना तसेच स्पर्धा आपल्या नावे केली आहे. जोरदन कॉक्स हा अंतिम सामन्यांमध्ये सामनावीर ठरला आहे. त्याने 28 चेंडूतच तीन चौकार व तीन षटकारांच्या मदतीने तुफानी 58 धावांचे योगदान दिले. तसेच जैक कौ्लीने ही 41 धावांचे योगदान दिले.प्रथम फलंदाजी करताना केंट संघाने 167 धावा केल्या होत्या. तर समरसेट कडून व्हॅन डर मर्वेणे सर्वाधिक तीन गडी बाद केल्या.
अंतिम सामन्यात धावांचा पाठलाग करीत असताना समर सेट ची सुरुवात चांगली झाली नाही. त्याच्या आघाडीचे दोन फलंदाज तीन धावातच तंबूत परतले होते. स्मीड व अबेलने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तेही बाद झाले. नंतर समर सेट च्या फलंदाजाची अवस्था ‘तू चल मै आया’अशी झाली होती. शेवटी समर सेटला 142 धावा पर्यंतच मजल मारता आली. समर सेट कडून स्मीडने सर्वाधिक 43 धावा केल्या, मात्र तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. केंट कडून जो डेनली ने तीन गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कैस अहमद नेही दोन गडी बाद करत विजयास हातभार लावला.