सुरत- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र बॅडमिंटन संघाने कांस्य पदक जिंकले. महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघास उपांत्य फेरीत अग्रमानांकित तेलंगणा संघाकडून अटीतटीच्या झुंजीत 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
त्यामु्ळे महाराष्ट्र संघास कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदक विजेत्या संघात चिराग शेट्टी, रितिका ठाकरे, वरुण कपूर, मालविका बनसोड, विप्लव कुवळे या खेळाडूंचा समावेश आहे. या संघास प्रशिक्षक अक्षय देवलकर व वरुण खानविलकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांनी कांस्य पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.