गोलंदाजाची अप्रतिम कामगिरी, राजस्थान समोर 155 धावांचे लक्ष्य.

आज आयपीएल मध्ये दोन सामने खेळवले जाणार आहे तर यामध्ये पहिल्या सामन्यांमध्ये राजस्थान समोर दिल्लीच्या आव्हान आहे. यामध्ये राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता,

तर गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरविला. गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल दिल्लीला फक्त 154 धावा पर्यंतच मजल मारता आली. तर राजस्थान समोर दुसऱ्या गावामध्ये 155 धावांचे लक्ष्य असणार आहे.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर गोलंदाजांनी कर्णधाराला निराश केले नाही. दिल्लीची सलामी जोडी 20 धावा तंबूत परतली होती. त्यानंतर कर्णधार रिषभ पंत व श्रेयस अय्यर ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

शीमरोन हेटमायेर नेही 28 धावांची खेळी केली. दिल्लीकडून श्रेयस अय्यर ने सर्वाधिक 43 धावा केल्या तर कर्णधार रिषभ पंत ने 24 धावा केल्या. तळामध्ये ललित यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 14 व 12 धावा करून संघाला कसेबसे दीडशे दहापर्यंत पोहोचवले. राजस्थान कडून मुस्तफिजुर रहमान हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने आपल्या चार षटकांमध्ये मात्र 20 धावांच्या मोबदल्यात दोन महत्त्वाचे गडी बाद केले. चेतन साकरीयाने 2 तसेच कार्तिक त्यागी व राहुल तेवटीयाने प्रत्येकी एक गडी बाद करून त्याला मोलाची साथ दिली.

You might also like

Comments are closed.