• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

बीसीसीआयने कनिष्ठ गटातील महत्त्वपूर्ण स्पर्धा स्थगित केली आहे.

by pravin
December 31, 2021
in क्रिकेट, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

जगभरात कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनने थैमान घातले आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे आणि रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटप्रेमीं देखील संभ्रमावस्थेत आहेत. अशात बीसीसीआयने  आगामी काळातील एक महत्वाची क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळली जाणारी १६ वर्षाखालील विजय मर्चेंट  स्पर्धा स्थगित केली गेली आहे. एका प्रमुख वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सचिव जय शाह  यांनी गुरुवारी (३० डिसेंबर) विजय मर्चेंट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना इ मेल पाठवून सांगितले की, देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात चांगली राहिली असून, आतापर्यंत ७४८ सामने खेळले गेले आहेत. परंतु कोरोनाचे नवीन रुग्ण अचानक वाढू लागल्यामुळे जूनियर क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली आहे. मोठा निर्णय घेत विजय मर्चेंट ट्रॉफी २०२२ रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

 

 

जय शहा म्हणाले, आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत. जर सुरक्षा बाळगली गेली नाही, तर भविष्यात रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे तज्ञ आणि मेडिकल टिमसोबत दीर्घ चर्चा कल्यानंतर १६ वर्षाखालील विजय मर्चेंट ट्रॉफी २०२२ स्थगित केली गेली आहे. याचे प्रमुख कारण आहे की, सहभाग घेणार्या खेळाडूंचे लसीकरण झालेले नाही आणि त्यांना संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे. आम्ही आपल्या गुणवंत आणि युवा क्रिकेटपटूंच्या आरोग्याला धोक्यात टाकू शकत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला जात आहे.’

 

 

दरम्यान, बीसीसीआयच्या आयोजनात खेळवली जाणारी १६ वर्षाखालील विजय मर्चेंट क्रिकेट स्पर्धा ९ जानेवारीपासून सुरु होणार होती. परंतु आता बीसीसीआयने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा डेहराडूनमध्ये आयोजित केली गेली होती. त्यापूर्वी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना त्याठिकाणी पोहोचण्याच्या सुचना केल्या गेल्या होत्या.

 

Tags: BCCIJay Shahvijay merchant trophy
ShareTweetSend
Next Post

प्रो कबड्डी; पुणेरी पलटण तमिल थलाइवाजकडून चारीमुंड्या चीत

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.