बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या दिवशी पहिल्या सामन्यात तमिल थलाइवाज व पुणेरी पलटण हे संघ समोरा समोर आले. चांगल्याच रंगलेल्या या सामन्यात तमिल थलाइवाजने पुणे संघाचा ३६-२६ असा पराभव करत विजयाची नोंद केली
सुरुवातीपासून काहीश्या वेगवान झालेल्या सामन्यात तमिल थलाइवाजने मध्यंतरापर्यंत १८-११ अशी आघाडी घेतली होती. मागील हंगामात पुणे संघाचा सदस्य असलेला मंजीत पहिल्या हाफमध्ये चमकला. त्याने दोन सुपर रेड लगावल्या. राहुल चौधरीचे अपयश पुन्हा एकदा पुणे संघासाठी निर्णायक ठरले.दुसऱ्या हाफमध्ये महाराष्ट्राच्याच अजिंक्य पवार याने तमिल थलाइवाजसाठी सुपर टेन कमावला. दुसरीकडे, पुणे संघासाठी अस्लम इनामदार याने गुण नोंदवत एकाकी लढत दिली.