औरंगाबाद(प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयाने बात्रा आणि भानोत गटाने दाखल केलेले अपील फेटाळले असून भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर त्यांची झालेली अनधिकृत निवड टिकवण्यासाठी या जोडगोळीने केलेले अखेरचे प्रयत्नही व्यर्थ ठरले आहेत. दरम्यान या प्रकरणी नवी दिल्लीतील दिल्ली उच्च न्यायालयत १ एप्रिल शुक्रवारी अंतिम सुनावणी होणार आहे.
न्यायालयाने या आधीच्या सुनावणीत भारतीय ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक नव्याने कायद्यानुसार घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगास दिले आहेत.या प्रकरणी भारतीय ऐथलेटिक फेडरेशन, हॉकी इंडिया यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.तसेच या आधिचे अपिल व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या प्रकरणी नरेंद्र धरूव बात्रा, ऐथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया वि.राहुल मेहरा यांचे अपिल माननीय सर्वोच्च न्यायालयाने खारीज केले आहे.