बार्टी’ बनली चॅम्पियन..! ४४ वर्षांनंतर रचला इतिहास

अ‍ॅश्ले बार्टीने इतिहास रचला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी , तिने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. तिने आज शनिवारी महिला एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सचा ६-३, ७-६ असा पराभव केला. हा सामना २७ मिनिटांत संपवला. विशेष म्हणजे बार्टीने संपूर्ण स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.

बार्टीने २८ वर्षीय कॉलिन्सवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. यानंतर कॉलिन्सने दुसऱ्या सेटमध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण बार्टीने हा सेट ७-६ असा जिंकून आपले तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. बार्टीने यापूर्वी २०१९ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०२१ मध्ये विम्बल्डन जिंकले होते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बार्टीचा विजय-पराजय रेकॉर्ड आता २४-८असा आहे. २०२२मध्ये तिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला जेथे तिला अमेरिकन खेळाडू सोफिया केनिनने पराभूत केले.

४४ वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावणारी बार्टी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरली आहे. यापूर्वी १९७८ मध्ये ख्रिस ओ’नीलने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.

You might also like

Comments are closed.