औरंगाबाद(प्रतिनिधी): औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत तेजस पतलुरे, अजिंक्य नरवडे, सारा साळुंके, हर्ष तांबारे, निधी चौधरी आदींनी विजयी सुरूवात केली. बन्सीलाल नगर मनपा हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत एकूण १५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
मुलांच्या १५ वर्षाखालील गटात तेजस पतलुरेने जबरदस्त स्मॅशच्या जोरावर अर्जुन पाटीला गुण घेण्याची संधी दिली नाही. सामन्यात तेजसने पहिल्यापासून वर्चस्व राखत ३०-१८ गुणांनी विजय मिळवला. मुलींमध्ये सारा साळुंकेने राष्ट्रीय खेळाडू स्वरदा बामनोदकरला एकतर्फी सामन्यात ३०-१७ ने हरवत पुढील फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचे उद्घाटन मनपा उपायुक्त तथा क्रीडा विभाग प्रमुख सौरभ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर गजानन बारवाल, विकास जैन, मनपा वैद्यकिय अधिकारी श्रीमती भांबरे, प्रभावती बारवाल, मनपा क्रीडाधिकारी संजीव प्रसाद बालय्या यांची उपस्थिती होती.
विजेते खेळाडू :
१५ वर्षाखालील गट – अजिंक्य नरवडे वि.वि. अथर्व चौरे ३०-२६, अर्णव चिचाणी वि. वि. गौरांग सराफ ३०-१९, श्रीनिवास केंद्रे वि.वि. श्लोक तोतला ३०-११. मुली – सिया बेंबडे वि.वि. संस्कृती गुप्ता ३०-१२, त्वनी जोशी वि.वि. शलाका भाले ३०-२६. १७ वर्षाखालील मुले – हर्ष तांबारे वि.वि. वैभव मिसाळ ३०-०, सार्थक दळवी वि.वि. पृथ्वीराज थोटे ३०-१९, राघव धुमाळ वि.वि. श्लोक बधाने ३०-२८. १३ वर्षाखालील गट मुले – यश निकम वि.वि. उत्कर्ष अधिकार ३०-०४, देवांश पाटील वि.वि. निशांत जाधव ३०-०३, चंद्रांशु गुंडले वि.वि. हर्षवर्धन तौर ३०-०५. १० वर्षाखालील मुले – लवीश मुळे वि.वि. वैष्णव नंदगिरी ३०-१०, श्लोक पाटील वि.वि. अर्णव चाबुकस्वार ३०-२४.