ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ICC महिला क्रिकेट विश्वचषक, 2022 स्पर्धेचा अंतिम सामना हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च, न्यूझीलंड येथे खेळवला जात आहे. गतविजेत्या इंग्लंडने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने ५० ओव्हरमध्ये बलाढ्य ३५६ धावा केल्या. ज्यात एलिसा हिलीने (alyysa healy) १३८ चेंडूत विक्रमी १७० धावा केल्या. ज्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ढासळताना दिसला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ७१ धावांनी सामना जिंकत ७व्यांदा वर्ल्डकप आपल्या नावे केला आहे.
आयसीसी महिला विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याचा निर्णय इंग्लंडला उलट पडला. प्रत्युत्तरात सलामीवीर लवकर गमावल्यामुळे इंग्लंडची सुरुवात डळमळीत झाली. त्यानंतर हीदर नाइटने (heather knight) नताली स्कायव्हरसह (natalie sciver) तिसर्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यावेळी नतालीने इंग्लंडकडून १०३ चेंडूत शतक झळकवले. मात्र तिचे शतक इंग्लडच्या कामी आले नाही. इंग्लडची खेळी २८५ धावांवर संपुष्टात आली.
Stuff of dreams ✨
A seventh ICC Women's Cricket World Cup title for Australia 🏆#CWC22 pic.twitter.com/dN2s9Xh5Y2
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) April 3, 2022
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी यावेळी अप्रतिम कामगिरी केली. त्यांच्याकडून अलाना किंगने आणि जेसा जॉन्सनने ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या आणखी एक पाऊल जवळ आणले. ६ वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाने गतविजेत्या इंग्लडला पराभूत करत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. तब्ब्ल नऊ वर्षांनी ऑस्ट्रेलिया महिला संघाने ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
महिला विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या:
१७० – एलिसा हिली विरुद्ध इंग्लंड, २०२२
१०७* – कॅरेन रोल्टन विरुद्ध भारत, २००५
९१ – बेलिंडा क्लार्क विरुद्ध न्यूझीलंड, २०००
८६ – पुनम राऊत विरुद्ध इंग्लंड, २०१७
७९ – डेबी हॉकले विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९९७
यष्टीरक्षक म्हणूनही हे विक्रम केले नावे
याखेरीज कोणत्या वनडे मालिकेत दोनपेक्षा जास्त शतके करणारीही हिली केवळ दुसरीच यष्टीरक्षक फलंदाज आहे. तिच्यापूर्वी रिचेल प्रिएस्टने २०१५ मध्ये हा विक्रम आपल्या नावे केला होता. तिने या मालिकेत २ पेक्षा जास्त शतके केली होती.याखेरीज संपूर्ण विश्वचषकात ४४५ धावा करत करत हिली एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणाराही पहिली खेळाडू बनली आहे. तिच्यापूर्वी सारा टेलरने २०१७ सालच्या विश्वचषकात ३९६ धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला होता.