औरंगाबाद(प्रतिनिधी): १६व्या राज्यस्तरीय टंबलिंग आणि ट्राम्पोलीन जिम्नॅस्टिक्स स्पर्धे नुकत्याच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती.या ठिकाणी दिनांक ०८ ते १० एप्रिल २०२२ यादरम्यान पार पडलेल्या स्पर्धेमध्ये औरंगाबाद संघाने चांगली कामगिरी करत वैयक्तिक दोन पदके तसेच सांघिक पदक पटकावले तसेच दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.
साहिल कन्हेकर यांनी चांगली कामगिरी करत ट्राम्पोलीन जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात १६ वर्षाखालील मुले या वयोगटात वैयक्तिक रौप्यपदक मिळवले तसेच महाराष्ट्र संघामध्ये आपले स्थान पक्के केले. अजय पहुरकर याने वरिष्ठ गटात खेळत वैयक्तिक कास्यपदक पटकावले त्यानेही महाराष्ट्र संघामध्ये आपले स्थान निश्चित केले तसेच 14 वर्षाखालील मुलीच्या संघाने ट्राम्पोलीन जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात स्पर्धे सांघिक तृतीय क्रमांक पटकावले.
या संघामध्ये १)श्रेया तळेगावकर २)अद्विका भागवतकर ३)साधना सुदामे ४) अईरा एकबोटे यांचा समावेश होता. तसेच १६ वर्षाखालील मुलांच्या संघाने टंबलिंग जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात या खेळाडूनी १)आयुष मुळे २)अन्वय वावरे ३)यश हर्सूलकर ४)अभिषेक कापसे यांनी उत्कृष्ट कामगिरी करून औरंगाबाद संघासाठी सांघिक तृतीय पदक पटकावले. या संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून डॉ.रणजीत पवार तसेच व्यवस्थापक म्हणून कल्पना वांगीकर यांनी काम पाहिले.
राज्यस्तरीय टंबलिंग आणि ट्राम्पोलीन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव डॉ.मकरंद जोशी तसेच औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी,अध्यक्ष डॉ. आदित्य जोशी,सचिव हर्षल मोगरे,कोषाध्यक्ष सागर कुलकर्णी,डॉ.विशाल देशपांडे,रोहित रोंगे,संदीप गायकवाड,राहुल तांदळे आदींनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंना व प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या.