राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर

औरंगाबाद- बुलढाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या पुरुषांच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद संघाची घोषणा औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेतून करण्यात आली. विविध वजन गटात विजयहून औरंगाबादच्या संघात निवडण्यात आलेले खेळाडू खालीलप्रमाणे प्रमाणे आहेत
४६-४८ किलो: कृष्णा राऊत, ४८-५१ किलो: अमोल अमरसिंग, ५१-५४ किलो: मंगेश वाडेकर, ५४-५७ किलो: विजय शेळके, ५७-६० किलो: विकास नरवडे, ६०-६३ किलो: रितिक राजपूत, ६३-६७ किलो: हिमांशू मुकिंद, ७१-७५ किलो: योगेश दवणे, ८०-८६ किलो: ईशांत लाहोट, ८६-९२ किलो: ईश्वर साळुंके.
कोच-राहुल टाक आणि अजय जाधव. संघात निवडण्यात आलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष तथा शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी, शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर केजल भट, सचिव पंकज भारसाखळे, कोषाध्यक्ष आरोह बर्वे, प्रदीप खांडरे, नीरज भारसाकळे यांनी शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.