औरंगाबादचे हॉकी खेळाडूं महाराष्ट्राच्या निवड चाचणीसाठी रवाना…

औरंगाबाद- सिनियर महिलांची आणि ज्युनिअर मुलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धा हॉकी इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघांच्या निवडीसाठी पुणे, बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी मध्ये हॉकी महाराष्ट्राच्या वतीने १३ सप्टेंबर पासून निवड चाचणी आयोजित केलेली आहे.

या निवड चाचणीसाठी औरंगाबाद मधून सिनिअर महिलांच्या गटातून अनिता शर्मा, प्रियांका वाहूळ, नाजुका मोहिते, अंजली जुंबडे, पूनम वाणी, नेहा सूर्यवंशी यांची तर ज्युनिअर मुलांच्या गटातून किशन चव्हाण, गोलू गुप्ता, पवन मंडोरे, ओम चांगले, मोहन डोडा आणि सुरज यादव यांची निवड औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या हॉकी ऍस्ट्रोटर्फ मैदानावर आयोजित निवड चाचणीतून करण्यात आली. साईचे हॉकी कोच कपिल भोजने आणि जिल्हा हॉकी संघटनेचे शेख साजीद यांनी निवड समितीचे प्रमुख म्हणून काम पहिले. नाजुका मोहिते, प्रियांका वाहूळ, पूनम वाणी, अनिता शर्मा, गोलू गुप्ता, सुरज यादव यांनी आपल्या खेळाच्या कॊशल्याच्या जोरावर यापूर्वी हि महाराष्ट्रच्या संघात स्थान मिळवलेले होते त्यामुळे या सगळ्यांकडून निवड चाचणीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

औरंगाबाद ज़िल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष माजी आ.श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, उद्योजक दिनेश गंगवाल, शेख साजीद, शामसुंदर भालेराव, संजय तोटावाड यांनी हॉकीपटूंना पुढील वाटचालीसाठी शुभेछया दिल्या आहेत.

You might also like

Comments are closed.