औरंगाबाद(प्रतिनिधी): महाराष्ट्र ॲमेचर नेटबॉल असोसिएशन च्या वतीने २२ ते २४ एप्रिल २०२२ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे ज्युनियर राज्य स्तरीय नेटबॉल स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत औरंगाबाद जिल्हा मुले व मुली दोन्ही संघ सहभागी होणार आहे या स्पर्धा करीता जिल्हा स्तरीय निवड चाचणी स्पर्धा १२ एप्रिल रोजी सायंकाळी ४.०० वा सिडको एन ७ येथील मातोश्री आंबेडकर हायस्कूलच्या मैदानावर होईल.
औरंगाबाद जिल्हाचा अंतिम संघाची घोषणा लगेच सायंकाळी ०६.३० वाजता मैदानावर होईल. ज्या खेळाडूंचा जन्म २४ एप्रिल २००३ किंवा त्या नंतर आहे ते खेळाडू पात्र आहेत. इच्छूक खेळाडूंनी त्वरित आपले आधारकार्ड आणि ३ पासपोर्ट फोटो त्वरित जमा करावे या निवड चाचणी स्पर्धांमध्ये आधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावे असे आवाहन संघटनेचे सुनिल डावकर,धर्मेंद्र काळे, सतिश इंगळे, रमेश प्रधान, सुरेश त्रिभुवन, दिलीप जाधव, आकाश सरदार, सचिन दांडगे, हर्षवर्धन मगरे, आदींनी केले आहे.