अथर्व पवार या खेळाडूंची महाराष्ट्राच्या ज्युनियर हॉकी संघात निवड

फलटण (प्रतिनिधी): हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून बालेवाडी पुणे येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र ज्युनियर हॉकी मुले संघाच्या निवड चाचणीमध्ये दि हॉकी सातारा संघटनेच्या कु. अथर्व पवार या पुरुष खेळाडूंची निवड झाली आहे.
सदर ज्यूनियर पुरुष हॉकी स्पर्धा कोविलपट्टी, तामिनाडू येथे आयोजित करण्यात येत आहेत, त्या स्पर्धांमध्ये वरील खेळाडू सहभागी होणार आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत सुरु असणाऱ्या जिल्हा हॉकी प्रशिक्षण केंद्रामध्ये हा खेळाडू जिल्ह्याचे मुख्य हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ , सागर कारंडे आणि बी बी खुरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, मुधोजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, फलटणचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे,  शिवाजीराव घोरपडे दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, सदस्य महेंद्र जाधव, प्रविण गाडे, सुजित निंबाळकर, सचिन लाळगे यांनी अभिनंदन केले आहे.

You might also like

Comments are closed.