स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. विराटच्या राजीनाम्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं त्याच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.
मला २०१४ मधला तो दिवस आठवतो जेव्हा तू मला सांगितले होते की, धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे तुला कर्णधार बनवण्यात आले आहे. मला आठवतंय एमएस, तू आणि मी त्या दिवशी नंतर गप्पा मारल्या होत्या. आणि कर्णधारपदाची जबाबदारी आल्यावर तो तुझी दाढी किती लवकर पांढरी होऊ लागेल, यावरून गंमत करत होता. त्यावर आपण सगळे खूप हसलो होतो. त्या दिवसापासून, खरंच मी तुझी दाढी पांढरी झालेली पाहिली आहे. मी तुझी करिअरमध्ये वाढ होताना पाहिली आहे. आणि हो, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझी प्रगती आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने जी कामगिरी केली याचा मला खूप अभिमान आहे. तुझ्या योगदानामुळे संघात जी वाढ झाली, त्याचा मला अधिक अभिमान आहे. २०१४ मध्ये आम्ही खूप तरुण आणि भोळे होतो. फक्त चांगला हेतू, सकारात्मक प्रेरणा आणि हेतू तुम्हाला आयुष्यात पुढे नेऊ शकतात, असा विचार करायचो. त्याचा फायदा नक्कीच होतो, पण आव्हानांशिवाय नाही. यापैकी बरीचशी आव्हाने ज्यांचा तु सामना केलास ती नेहमीच मैदानावर नव्हती. पण मग, हे आयुष्य आहे, हो ना? ते तुमची अशा ठिकाणी परीक्षा घेते जिथे तुम्हाला त्याची अपेक्षा नसते आणि जिथे तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते. आणि मला तुझा अभिमान आहे की तुझ्या चांगल्या हेतूच्या आड काहीही येऊ दिले नाही. तू संघाचं खूप उत्तम नेतृत्व केलंस. जेवहा कधी तू हरलास तेव्हा मी तू मी तुझ्या शेजारी बसायचे. तू डोळ्यांत अश्रू घेऊन विचार करायचा की अजून काही करू शकला असतास का? हाच खरा तू आहेस आणि तुला प्रत्येकाकडून हेच अपेक्षित आहे. तू अपारंपरिक आणि सरळ बोलणारा आहेस. ढोंग हा तुझा शत्रू आहे आणि हेच तुला माझ्या नजरेत आणि तुझ्या चाहत्यांच्या नजरेत महान बनवते. कारण या सर्वांमागे तुझा शुद्ध, निर्मळ हेतू नेहमीच होता. आणि प्रत्येकजण ते खरोखर समजू शकणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे, खरोखरच धन्य ते लोक ज्यांनी डोळ्यासमोरून तुला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तू परिपूर्ण नाहीस आणि तुझ्यातही काही दोष आहेत पण तू ते कधी लपवण्याचा प्रयत्न केला आहे का? तू जे केलंस ते म्हणजे नेहमी योग्य गोष्टीसाठी उभे राहणे, कठीण गोष्टीसाठी उभं राहणं, नेहमी! तू लोभापायी काहीही धरून ठेवले नाही, हे पदंही नाही आणि मला ते माहित आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीला घट्ट धरून ठेवते तेव्हा ती व्यक्ती स्वतःला मर्यादित करते. आणि तू अमर्याद आहेस. तू या ७ वर्षांत जे शिकलास ते आपल्या मुलीला तिच्या वडिलांमध्ये दिसेल. तू चांगलं केलंस.. ❤️”
अशाप्रकारे विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मानं तिच्या भावना व्यक्त केल्या.